हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- नगरपरिषदेचा कारभार गेल्या 27 महिन्या पासून प्रशासकिय राजवटीत सुरू आहे. वारंवार निवडणूका पुढे ढकलण्यात येत असल्यामुळेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांविनाच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर नगर परिषदेचे कार्य सुरू आहे. या प्रकारामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आता यातच नगर परिषदेतील एका अधिकाऱ्यांकडून एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची घटना समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
सध्या बल्लारपूर नगर परिषदेचा कारभार प्रशासक बघत आहे. प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांमध्ये इतकी हिम्मत कूठून येत आहे? नगरपरिषदे अधीन असलेल्या प्रज्ञा दारूंडे नामक महिला कर्मचारीला मारहाण करणारी महिला अधिकारी संगीता उमरे अनेक वर्षांपासून बल्लारपुर नगरपरिषदेत एकाच ठिकाणी कशी काय कार्यरत असू शकते? असा सवाल आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केला आहे. अश्या प्रकारामुळे असे दिसून येते कि नगरपरिषदेचे प्रशासक म्हणजेच मुख्याधिकारी यांचे कोणतेही नियंत्रण इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नाही, या सर्व बाबींकडे स्थानिक आमदार मुनगंटीवार यांचेही दुर्लक्ष होत आहे, असेही पुप्पलवार म्हणाले.