युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपुर :- हक्क कृती समीतीची आंबेडकर भवन मुंबई येथे दि. 12 जून 2022 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, केंद्र व राज्य सरकारचे दडपशाही धोरणा विरोधात नागपूर येथे भव्य मोर्चा काढण्याबाबत एकमताने ठरविन्यात आले होते. या मोर्चासाठी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तसेच आयबी सेफ संघटनेने रु.1 लाख लढानिधी घोषित केला आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने सर्व सामन्याच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्यात येणार आहे
आज देशात मोठ्या प्रमाणात संविधानाचे विकृतिकरण, सरकारी संस्थाचे खाजगीकरण, ओबीसी आरक्षण, अल्पसंख्याक समुदायांचे खच्चीकरण, अग्निपथ योजना, पदोन्नती मधिल आरक्षण, रिक्त पदे भरणे, सुशिक्षित तरुणाना रोजगार, शिक्षणाचे बाजारीकरण, वचित समुहावर होणारा अन्याय -अत्याचार या वर ईतर विषयावर जन आंदोलन ऊभे करण्यासाठी रविवार दि. 17 जुलै ला दुपारी 1.00 वाजता, रविभवन येथे, सभा आयोजित केलेली आहे.
यासभेला अरुण गाडे, काष्ट्राईब महासंघ, प्रा. डा. प्रदीप आगलावे, आंबेडकरी विचारवंत, प्रा. जावेद पाशा कवि, साहित्यिक, ईंजि. कुलदीप रामटेके, प्रा. मधुकर ऊईके, अ.भा.आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटना, हरिष ऊईके, महाराष्ट्र राज्य गोंडवाना पार्टी, प्रा.रमेश पिशे, अ.भा. पिछडा संघ, ईंजि राहुल परुळकर बानाई, बलदेव आडे जनशक्ति शिक्षक संघटना, संजय फुलझेले, भिमआर्मी, पुष्पा बौध्द, छाया खोब्रागडे, प्रा. सरोज आगलावे, महिला क्रांती परिषद, ॲड, सोनिया गजभिये, ईंजि.सुषमा भड, प्रा. राहुल मुन, संविधान परिवार एम.एस. जांभुळे, पांडुरंग ढोले, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना दिनेश दखने, विद्यापीठ संघटना, नामा जाधव-गोर बंजारा संघटना, शिवदास वासे-ऑफिसर फोरम जयसिंघ जाधव, शिक्षक संघटना, अमन कांबळे आवाज इंडिया टि.व्हि. केवल जिवनतारे पत्रकार, ॲड. आकाश मुन, राजन वाघमारे, केवल जिवनतारे पत्रकार, डॉ. स्मिता मेहत्रे, शिक्षक संघटना, प्रतिक पटले- संभाजी ब्रिगेड निर्गुणशा ठमके, माजी शिक्षणाधिकारी, प्रविण मेश्राम, मागासवर्गीय शिक्षक संघटना, अतुल खोब्रागडे, खूप लढलो बेकिने आता लढू या एकीने, धर्मेश फुसाटे, डॉ. निना वानखडे ईतर सर्व सामाजिक व कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी ना आमंत्रित करण्यात आले आहे तरी सर्वांनी ऊपस्थित राहण्याचे आव्हान प्रा. मनिष वानखेडे, शामराव हाडके, सिताराम राठोड यांनी केले.