कळरमेश्वर बाजार चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले.
युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन रामटेक:- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कळमेश्वर सावनेर मतदार संघातील मतदारांना या क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेले गुंड माफियागिरी ची दादागिरी संपुष्टात आनण्याकरिता फार मोठी संधी चालून आली असून त्याकरिता मी सदैव तुमच्या पाठीशी राहील अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवार दि.१२ रोजी सायंकाळी ६ वाजता कळमेश्वर येथील स्थानीय बाजार चौकात एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना दिली.
महायुतीचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषनात म्हणाले की, काँग्रेस गेली अनेक वर्षे गरिबी विषयी बोलत राहिली. गरीबी हटाओ काँग्रेसचा नारा होता. मात्र काँग्रेसच्या 60 वर्षांच्या राजवटीत त्यांना गरिबी हटवता आली नाही. ते गरीबांना दूर करतात पण गरिबी दूर करू शकले नाहीत. पण मोदींच्या 10 वर्षात मोठा बदल केला. देशातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. देशातील गरिबी दूर होणे हे म्हणजे मोदी मॅजिक आहे. जगातील सर्व अर्थतज्ञ आश्चर्यचकित झाले. मोदी मॅजिक काय आहे? मोदीजींनी गरिबांना घरे, गरिबांना पाणी, गरिबांना वीज, गरिबांना कर्ज देण्यासाठी इतका खर्च केला आणि तरीही भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोविड नंतर संपूर्ण जग जेव्हा संकटात होता. तेव्हा भारत प्रगतीवर अग्रेसर होता. जगभरात मंदीची लाट आहे पण, भारतात मात्र तसे झाले नाही. मंदी नाही. देशात पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधल्या गेली. तर महिलांना पाण्यासाठी वणवण आता भटकावे लागत नाही. त्यांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. हा मोदी मॅजिक असल्याचे दावा फडणवीस यांनी केला.
मोदींनी 50 कोटींहून अधिक लोकांना मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे, मोदींमुळे 50 कोटींहून अधिक लोकांना स्वयंरोजगार किंवा व्यवसाय मिळाला आहे. या 50 कोटींहून अधिक लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत. ज्या आमच्या बहिणींना मुद्रा लोन मिळाले आहे आणि त्या आपल्या पायावर उभ्या आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे वाक्य अधोरेखित केले. ‘माणूस जेव्हा त्याच्या पायावर उभा राहतो तेव्हा तो माणूसच त्याच्या पायावर उभा असतो. पण जेव्हा एखादी महिला तिच्या पायावर उभी राहते तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवलेल्या पायाभूत सुविधांपासून देशाला गती मिळाली. मोदींनी सर्व रेल्वे स्थानके, पुनर्बांधणी, रेल्वे स्थानके बदलले आहेत.
आम्हाला मोदींच्या पाठीशी उभा राहणारा संसद सदस्य निवडायचा आहे असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी उपस्थीतांना केले. त्यामुळे ही राज्याची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नाही. राष्ट्राचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रविरोधी शक्तींविरुद्ध लढत आहेत. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की ही निवडणूक एका विशिष्ट मतदारसंघाची नसून देशाच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने योग्य नेतृत्वाची आहे याकरिता प्रत्येक मतदाराने जागृत राहून सहज विवेक बुद्धीने मतदान करावे अशी माझी नम्र विनंती आहे भारत माता की जय म्हणणारे लोकप्रतिनिधी पाहिजे असेही फडणवीस यांनी येथे उपस्थितांना सांगीतले.
यावेळी सभेला डाॅ. राजीव पोतदार, माजी आ. आशिष देशमुख, डाॅ.विकास महात्मे, रामराव मोवाडे, मनोहर कुंभारे, विजय देशमुख, अरविंद गजभिये, ऍड.प्रकाश टेकाडे, सुधाकर कोहळे, अशोक धोटे, किशोर चौधरी, संदीप उपाध्याय, धनराज देवके आदी भाजप नेते व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थीत होते.
आयोजित विशाल जाहीर सभेत विविध पक्षातील सुमारे 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. या सभेला कळमेश्वर तालुक्यातील तसेच सावनेर काटोल परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक महिलावर्ग युवक उपस्थित होते.