अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लोक साहित्य परिषद, हिंगणघाटचे माजी संस्थापक सभासद स्व.प्रा.डाॅ. रवीन्द्र ठाकरे यांचां स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी दिव्यवंदना आधार फाऊंडेशन चिमूर ची टीम रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार अनाथ मनोरूग्ण यांचे केस कापणे, त्यांची आंघोळ करणे व त्यांना कपडे घालणे ही सेवा निस्वार्थपणे हिंगणघाट येथे करीत होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सेवाभावी दोन तरुण व तरुणीचे सत्कार करून त्यांना ठाकरे सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्या शीतल रवीन्द्र ठाकरे यांनी ११ हजार रुपयाची देणगी प्रदान केली.
या कार्यक्रम सुरुवात सरांच्या प्रतीमेला हारार्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.प्रा.उषाताई थुटे, लोक साहित्य परिषदेचे सचिन ज्ञानेश्वर चौधरी, उपाध्यक्ष प्रा. अभिजीत डाखोरे, सदस्य प्रा.डाॅ.श्रीकृष्ण बोढे, मयुरी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.