अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १४ एप्रिल:- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आम आदमी पक्षाच्या वतीने राजकमल चौक सावनेर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. घाटोळे, गजेंद्र चौधरी, जामुवत वारकरी, मदन मोरे, श्री. लांबट व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनाचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.