अनिल अडकिने सावनेर नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७ एप्रिल:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा जागृती मंडळ व सुधाकर बागडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सावनेर बसस्थानक जवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ तीन दिवसीय भिम जयंती महोत्सवाची सुरुवात १३ एप्रिल रोजी गायक रत्नदीप रंगारी आणि गायक चन्नू राऊत आणि संच यांच्या संगीतमय दुय्यम भजनाने करण्यात आली. भजन स्पर्धेचे उद्घाटन भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रामराव मोवाडे यांच्या हस्ते झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण नंतर सामुहिक बुद्ध वंदना व बुंदा वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पुरीभाजी वाटप करुन महोत्सवाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शहराध्यक्ष ऍड. अरविंद लोधी होते. यावेळी कृउबाचे सभापती बाबाराव पाटील, भीम आर्मी नागपूर शहर अध्यक्ष गणेशदादा चाचेरकर, प्रा.साहेबराव विरखरे, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक मनीष अडागळे, राजू घुगल, रासप नेते राजू भुजाडे, मनीष खंगारे, सुधाकर बागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांनी ही अभिवादन केले.
यावेळी सावनेर येथील दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर सरदार, माजी मंत्री सुनील केदार, सामाजिक कार्यकर्ते डोमसाव सावजी शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल, मनोज बसवार, किशोर ढुंढेले, दिपक कटारे, बंडू दिवटे, अतुल नाईक, विजय ठाकरे आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ.मरफी, सुधाकर गजभिये, अँड शामराव गोंडुळे, राज पाटील, विजय बागडे, माजी उपाध्यक्ष मनोहर सोनटक्के, सुजित बागडे यांनीही अभिवादन केले.
यावेळी निमंत्रित मान्यवरांचे टोपी व टुप्पटा परीधान करून सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सचिव विकी शेंडे यांनी प्रास्ताविक, संचालन स्तूपा बागडे आणि आभारप्रदर्शन डॉ.साची डांगरे यांनी केले. या कार्यक्रमाचे
यशस्वितेसाठी सोनू गव्हाणे, धनंजय बागडे, उद्देश बागडे, चंदू गोंडुळे, राजेश बडखाने व सोनू गजभिये, होमेश्वर डोंगरे यांनी प्रयत्न केले.