अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंगणघाटच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून संतोष तिमांडे गुरूजी, पत्रकार वसंतराव कडू, कवि मंजिदबेग मुगल (शहजाद), प्रा. बाबाराव कोळसे, पत्रकार केशव तितरे लोकजनशक्ति पार्टी (रामविलास) वर्धा जिल्हा अध्यक्ष, साहित्यिक ज्ञानेश्वर चौधरी लोकसाहित्य परिषद सचिव, प्रविन कडू, राखी राठोड, विठ्ठलराव वाघमारे व उपस्थिताच्या हस्ते बाबासाहेबांच्या फोटोला मालार्पन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजित डाखोरे, तर आभार रमेश झाडे गांधी वाचनालय सचिव यांनी मानले. या कार्यक्रमाला गांधी वाचनालयाचे सदस्य व वाचक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

