अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १६ एप्रिल:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची रामटेक लोकसभेचे उमेदवार राजीवजी पारवे यांच्या प्रचारार्थ सावनेर बस स्टॅन्ड येथे जाहीर सभेत विरोधकावर जोरदार टिकास्त्र सोडले.
रामटेक लोकसभेसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबानावर निवडणूक लढत आहे. तुम्ही सावनेरवाशी त्यांना प्रचंड मताने निवडून द्या व दिल्लीला पाठवा मोदी साहेबांच्या हात बळकट करा अशी गॅरंटी मागितली.
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची तुम्ही हमी द्या आपल्या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी म्हणून आपल्याला एक एक मतदारसंघ महत्त्वाचा आपल्याला एक एक खासदार महत्त्वाचा आहे म्हणून रामटेकवाशी यांनी ठरविले आहे सावनेरवाशांनी ठरविले आहे की राजीव पारवे एक सर्व सामान्य हाडाचा कार्यकर्ता आहे त्यांना दिल्लीमध्ये पाठविण्याची गॅरंटी तुम्ही घेतली ना तेव्हा सावनेर वासियांनी होकार दर्शविला.
दहा वर्षांमध्ये मोदीजींनी केलेले काम व पन्नासाठ वर्षांमध्ये काँग्रेसने केलेले काम मोदीजींच्या जन्म राजनीतीसाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे त्यांनी आपले जीवन देशा करिता समर्पित केले आहे एक दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कुठे आणि गरम झाले की परदेशात थंड हवा खायला जाणारे कुठे. रामटेक हा पूर्वी काँग्रेसच्या बालेकिल्ला होता. १९९६ व्या वर्षी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेक वर भगवा फडकला आणि तो तसाच फडकत राहिला. राजू पारवे देखील हा भगवा खांद्यावर घेऊन दिल्लीत जाणार आणि या रामटेकला न्याय मिळवून देणारच अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी सावनेर वासियांना दिली.