महासांस्कृतिक महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाचा लाखो रुपये वायफळ खर्च. महासांस्कृतिक महोत्सवासाठी ६८८७५०० रुपयाची ई निविदा.
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शासकीय सर्वोपचार रुग्णालयात ओपीडी, वाॅर्ड, रक्ततपासणी, एक्स रे, एमआरआय आणि सिटी स्कॅनसारख्या सोयी वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने रुग्ण दिवसभर त्यांचा शोध घेत राहतात. रुग्ण अचूक पद्धतीने ठराविक ठिकाणी पोहोचावा म्हणून रुग्णालयात दिशादर्शक फलक लावावे व रुग्णाची त्यांच्या नातेवाईकाची होणारी गैरसोय टाळावी. याकरीता सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी 14 ऑक्टोंबर 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मिनाक्षी गजभिये यांना निवेदन देऊन मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सर्वोपचार रुग्णालयात दिशा दर्शक फलक लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना जा. क्रं. शावैमअ / बांधकाम / 6818 / 23 दि.18 ऑक्टोंबर 2023 रोजी रोजी कळविण्यात आले होते.
त्या पत्रावरून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांचे मार्फत सदर कामाकरीता लागणारे खर्चाचे अंदाजपत्रक जिल्हा नियोजन समिती अकोला यांना पत्र क्र. 8405/ प्रशा-3/ 2023 दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी मंजूरी करीता व निधी उपलब्धते करीता सादर केले आहे. मंजूरी नंतर व निधी उपलव्ध झाल्या नंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांना पत्राद्वारे कळविण्यात आले.
यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात चौकशी केली असता निधी उपलब्ध नाही असे सांगितले. जर निधी उपलब्ध नाही तर मग अकोला येथे दिनांक 6 मार्च ते 10 मार्च 2024 (5 दिवस) पर्यंत महासांस्कृतिक
कामाची किंमत रुपये ६८८७५०० महोत्सवाकरिता मंडप व लाइट साऊंड सिस्टीम महासांस्कृतिक महोत्सवासाठी ई निविदा कशी काढण्यात आली. एवढेच नव्हे तर महासांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी कलाकारांना लाखो रुपये मानधन देण्यात आले असा आरोप उमेश इंगळे सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक यांनी केला आहे.
जिल्हा प्रशासनाला आरोग्याच्या समस्ये संदर्भात बऱ्याच वेळा तक्रारी निवेदने दिले असून त्यांना रुग्णाच्या जीवाचे काही घेणेदेणे नाही यावरून दिसून येते एकीकडे महासांस्कृतिक महोत्सव राबवून लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला रुग्णांच्या जीवासाठी त्यांचे होणारे हाल थांबवण्यासाठी तात्काळ उपायोजना राबवून वायफळ निधी खर्च न करता सर्वोउपचार रुग्णालयातील दिशादर्शक फलक लावून रुग्नांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी केली आहे