दिलीप दहागांवकर, धाबा तोहोगाव प्रतिनिधी
मो.नंबर ७४९८०७३७२८
गोंडपिपरी:- तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका काँग्रेसचे (अनु.जाती विभाग) अध्यक्ष गौतम झाडे यांना मारहाण केल्याच्या जाहीर निषेध केला असून येथील तहसीलदार यांना त्या संधर्भात निवेदन सादर केले.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकबोरगाव येथील तालुका काँग्रेस चे पदाधिकारी येथील माजी उपसरपंच गौतम झाडे यांना ९ सप्टेंबर रोजी गावातील दुर्गे यांच्या पाणठेल्याजवळ सिमेंट बेंचवर बसून असताना काही मंडळींनी राजकीय वादातून शिवीगाळ करून मारहाण केली .मारहाण करणाऱ्यावर कारवाई झाली.हे गैरकृत्य केवळ वयक्तिक वादातून नसून राजकीय आकसापोटी घडल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.झाडे यांनी मारहाण प्रकरणाचा गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे तसे निवेदन ही तहसीलदारांना दिले.
यावेळी तुकाराम झाडे, निलेश संगमवार,अशोक रेचनकार,देविदास सातपुते,विनोद नागपुरे,नामदेव संगडे,बालाजी चंकापूरे, व पदाधिकारी उपस्थित होते
