कु.अनुष्का राजू ढोबळे जिल्हातून प्रथम तर चूकेश विजय मोटघरे जिल्ह्यातून द्वितीय.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) या परीक्षेत डॉ. बी. आर आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथील २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु.अनुष्का राजू ढोबळे ही वर्धा जिल्हातून प्रथम तर चुकेश विजय मोटघरे हा विद्यार्थी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कु.संपदा गोवर्धन कांबळे, कार्तिक संजय वाढई, कु.मानसी राजेंद्र कांबळे, कू.जिया संदिप कवाडे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत वार्षिक १२,००० रुपये शिष्यवृत्ती शासनातर्फे प्राप्त होणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विभाग प्रमुख पी.आर.मुंजेवार, सहाय्यक एच.एस.बागडे, डी.यु.तेलरांधे या सर्व शिक्षकांचे संस्थेचे सचिव अनिल जवादे, मुख्याध्यापक एच.पी.गुडदे, उपमुख्याध्यापक डाॕ.चंद्रकांत नगराळे, पर्यवेक्षीका सुनीता खैरकार, पर्यवेक्षक दिनेश वाघ, शिरपूरकर यांनी अभिनंदन केले आहे.