उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बुद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रवस्थी विहार सांगली संजयनगर यांच्या वतीने राजा सम्राट अशोक, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली.
या देशात राज्यकर्त्याला पक्षाला बंधन घालणारा दुसरा मजबूत पक्ष नाही अशीच स्थिती जर चालू राहिली तर येथे जर्मनी प्रमाणे हिटलरशाही अथवा रशियाची स्टॅलिन शाही आल्याशिवाय राहणार नाही या करिता आम्ही अल्पसंख्यांक असूनही विरोधाच्या आग्नित तेवत ठेवू या कार्यात इतरांचे सहकार्य मिळो न मिळो केव्हा ना केव्हा आमची मनोभवणा कार्यशक्ती यांचा इतरावर परिणाम होऊन ते आमचे ऐकतील ज्या प्रमाणे एखाद्या दिपमलेतील सर्व दिवे विझले पण एकच पणती मिणमिणत राहिली तरी ती पणती साऱ्या ना मार्गदर्शन करते त्याच प्रमाणे आमचा पक्ष लहान असून इतर पक्ष्यांना मार्गदर्शन करेल :विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे विचार अनेक वर्षापूर्वी व्यक्त केले होते.
गुरुवार दिनांक 11एप्रिल 2024 संध्याकाळी 7 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 व्या वी जयंती उत्साहात साजरी करणेत आली त्या मध्ये पथनाट्य विजयभाऊ लांडगे लिखित सादर करण्यात आले. यात भूमिका प्रामुख्याने शैलेजा साबळे, दीपमाळा कांबळे सपना भिसे, दीक्षा पवार, पवन कदम स्वतः विजय भाऊ लांडगे यांनी सादर केली. आजची स्त्री ही दुबळी नाही हा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.
त्यानंतर डॉ. संजय बनसोडे सर यांचे कांतीबा ज्योतिबा फुले यांचेवर व्याख्यान झाले. त्यांनी त्या वेळचा काळं खूप कठोर होता पुणे हा जातीवादी आडा होता फुले हे फक्त 7 वी शिकले होते नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी एक प्रसंग सांगितला फुले ज्योतिबा फुले मित्राच्या लग्नाच्या वरातीत गेले होते त्यांनी चांगला पेहराव केला होता कोट घातला होता आणि वरातीत थांबले, पण जातीय वाद्यानी कुजबुज सुरू केली हा शूद्र आहे वरातीत कसा काय आला आणि हे फुल्यांनी ऐकले आणि त्या वरातीत लोकांनी त्यांना खाली पडून लाथा बुक्क्यांनी मारल लोक पाहत उभ होते पण कोणी ही मध्ये आले नाही जोतिबांनी त्यांना जाऊन विचारणा केली तेव्हा त्या लोकांनी सरळ सरळ उत्तर दिले आपल्या सारख्यानी आसच बाजूला राहायचं असत आणि तेव्हा पासून फुले बदलले आणि जातीवाद्यान बरोबर बंद पुकरला. त्यानंतर जयंती का साजरी करावी हे सर्वान पर्यंत पोचवल.
दिनांक 12 एप्रिलला 7 वाजता खुले काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डॉ. कस्तुरे मॅडम, विजय लांडगे, सुजित कुमार कांबळे, मनीषा जाधव, दीपक कांबळे सर, मुबारक मुबारक, पवन कदम, विकास भिसे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे सर यांनी आपल्या कविता सादर केल्या .. व त्यांची गाजलेली गजल गाऊन दाखवली. त्याचप्रमाणे मागा डे सरांनी लोकशाही ही कविता सादर केली डॉ. कस्तुरे मॅडम याची कणभर का होईना क्षणभर का होईना बुद्ध होता येते ह्या कवितेने मन भारावून गेले.
दिनांक 13 एप्रिल रोजी बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला, त्यामधे छोट्या आणि मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला. देवयानी मधले सूर्वी मधले प्रेम वाघमारे, पल्लवी सदानंद, प्राजक्ता वाघमारे, प्रदीप कांबळे सर याची गाणी झाली यानंतर शुभम कुरुंद वाडकर याचा कार्यक्रमांनी सर्व परिसर मंत्रमुग्ध झाला. रात्री 11.30 वाजता कँडल मार्च छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमांगण परिसरा पर्यंत काढण्यात आली.
दिनांक 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 10 वाजता हर्षद दादा याच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध प्रतिमेला शशिकांत खांडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याते शशिकांत खांडेकर यांनी डॉ. बाबासाहेब यांचे कार्य त्याग आणि आपली जबाबदारी या विषयावर व्याख्यान दिलं. यावेळी डॉ. बाबासाहेबांचा एक आणि एक पैलू समजून सांगितला त्याचा पूर्ण जीवन पट आपल्या व्याख्यानातून सर्वांपर्यंत पोहचवला आणि बाबासाहेबाना लोक कधी पासून बाबासाहेब म्हणू लागले याचा वृंतात दिला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना पवन वाघमारे यांनी केली तर परिचय दीपमाला कांबळे यांनी दिला यावेळी अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष सुधीर कोलप यांनी केले आणि आभार माने सर यांनी मानल. यावेळी प्रामुख्याने रक्तदान शिबिर आयोजित केलं होत. त्या मधे 250 लोकांनी रक्तदान केलं. या कार्यक्रमास उपाध्यक्षा आयु सुनीता धम्म कीर्ती, शैलजा साबळे, उषाताई कांबळे, दीपमाला कांबळे, पवन वाघमारे, संभाजी माने, चंद्रकांत चौधरी, अवंतिका वाघमारे, जगन्नाथ आठवले, एस डी हर्षद सर्व सभासद उपासक उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

