क्राईम रिपोर्टर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पंजाब:- येऊन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पतीने आपल्याच गर्भवती पत्नीची पत्नीला जाळून हत्या केल्याने संपूर्ण पंजाब हादरले आहे. या घटनेनंतर राज्यात आरोपी विरुद्ध मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुल जन्माला येणार म्हणून अनेक आई वडील आनंदी असतात. त्यांचे जग संपूर्ण स्वप्नांनी भरलेले असते. मग ते मुलं जन्माला येण्याआधीच त्याचा सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते यात शिक्षणापासून ते त्याचा दररोजच्या गरजांपर्यंत सगळ आधीच तयार असत. पण सगळ्यांच्याच बाबतीत असे होईलच यात काही शंका नाही. काही लोक याला अपवाद असतात. पंजाबमधील एका नराधमाने संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जिवंत जाळून मारलं. तिच्या पोटात जुळी बाळं वाढत होती, मात्र हे कृत्य करताना त्या कोवळ्या जीवांचा विचार या नराधमाने केला नाही
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील रईया भागात बुलेड नंगल गावात ही घटना घडली आहे. सुखदेव असं या नराधम आरोपीचं नाव आहे. मृतक पत्नीचं नाव पिंकी आहे. पती पत्नीत होणाऱ्या घरघुती वादात आरोपीने आपल्या पत्नी सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या पिंकी ला जाळून हत्या केली. यावेळी नराधम आरोपीने तिच्या पोटात जुळी बाळं आहे याचा पण विचार केला नाही. आरोपीने केलेल्या कृत्यामुळे या जगात येण्याआधीच आईसह त्या बाळांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घडलं असं की , सुखदेव आणि पिंकी यांचं शुक्रवारी जोरदार भांडण झालं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की त्याच रूपांतर हिंसेत झालं . सुखदेव याने पिंकीला बेडला बांधलं आणि बेडसह तिला जाळून टाकलं. ती वाचवा वाचावा म्हणून किंचाळत होती मात्र आग भयानक असल्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न कोणीही करू शकाल नाही. या सगळ्यात मात्र सुखदेवच्या मनाला थोडासा सुद्धा पाझर फुटला नाही. दुर्दैवाने पिंकीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी 6 महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटात जुळी बाळं होती. या जगात येण्यापूर्वीच आपल्या आईबरोबर त्यांनी प्राण सोडले. हे कृत्य केल्यानंतर सुखदेव फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही, मात्र पोलिस त्याचा शोध घेत आहेत.