शाळेत प्रवेसासाठी संपर्क करण्याचे आवाहन शाळेचे मुख्यध्यापक गणेश दुधे यांनी केले आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील अवघ्या 2 किलो मिटर अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थांनी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.
शाळेत प्रवेशाकरीता इयत्ता 6 वी तील विध्यार्थी एकूण 40 तर 7 वी ते 10 वी करीता एकूण 10 विध्यार्थी (रिक्त जाग्यावर प्रवेश.) देण्यात येणार आहे. या शाळेत SC अनुसूचित जाती प्रवर्गातील च्या 80 टक्के विद्यार्थांना प्रवेश देण्यात येणार आहे तर अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील 10 टक्के विद्यार्थांना प्रवेश देण्यात येणार आहे, अपंग 3 टक्के व्ही.जे एन.टी 5 टक्के, तर एस.बी.सी 2 टक्के असे या पद्धतीने विद्यार्थांना प्रवेश देण्यात येणार आहे.
शाळेचे वैशिष्ट्य
1) ई -लर्निंग अध्यापन व ई लायबरी इंटरनेट सुविधेसह. स्वतंत्र्य संगणक कक्ष. 2) सेमी इंग्रजी माध्यम. 3) अनुभवी व तज्ञ् शिक्षक. 4) सुसज्ज स्वच्छ वातावरण तीन मजली इमारत. 5) सुसज्ज स्वतंत्र्य प्रयोगशाळा. 6) सुसज्ज ग्रंथालय. 7) प्रत्येक वर्गात इंटऑक्टिव. पॅनलची सुविधा. 8) अध्ययन, अध्यापन शैक्षणिक साहित्य,मोफत सुविधा, जेवण निवासाची सोय. 9) विविध खेळ व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन स्वतंत्र्य भव्य क्रीडागणं. 10) सुसज्ज इंडोर व आउटडोर व्यायामशाळा. 11) शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमवर्ग. 12) सुसज्ज संगीतवर्ग. इत्यादी या शाळेचे मार्फत विविध सुविधा मोफत दिले जाते.
प्रवेश घेतेवेळी विद्यार्त्यांना लागणारे कागदपत्रे 1) कॉस्ट सर्टिफिकेट. (जातीचा दाखला तहसीलदार कार्यालय मार्फत.) 2) रहिवासी दाखला (सरपंच किव्हा पोलीस पाटील मार्फत. 3) संचयी नोंदपत्रक (पूर्वीचा शाळेतून) 4) जवळच्या सामान्य दवाखान्यातुन वैधकीय निरोगी प्रमाणपत्र. 5) मागील इयतेची गुणपत्रिका. 6) उत्पन्न दाखला (इन्कम) तहसीलदार मार्फत. 7) विध्यार्त्याचे पासफोटो 5 प्रतीत. 8) आधार कॉर्डची झेरॉक्स लिंक पावती असणे जरुरीचे. 9) राशनकॉर्ड, एपिएल किव्हा बिपिएल झेरॉक्स प्रत. 10) राष्टीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत. 11) कुटूंबातील फोटो पासफोटो आकाराचा. 12) कोविड टिकाकरण प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे महत्वाचे आहे.
अधिक माहिती करीता संपर्क साधावा: मुख्यध्यापक = जि. एम दुधे. मोबाईल नंबर. 9923529489. सहाय्यक शिक्षक = पी. ए. लांजेवार. मोबाईल नंबर. 9049440285. सहाय्यक ग्रंथपाल = ए. के. खोब्रागडे. मोबाईल नंबर. 9405507404 या प्रवेशासाठी संपर्क करावे.

