टिळक विद्यापीठ पुणे चे ओमप्रकाश पवार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन, शहरातील 150 विद्यार्थ्याचा सहभाग.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालयात दिनांक 22 एप्रिल ते 04 मे 2024 या काळात विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी सुट्टीत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी उन्हाळी छंद शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबीराचे उदघाटन भारत विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा टिळक विद्यापीठ पुणे चे क्रीडा मार्गदर्शक तसेच खेलो इंडिया व राज्य स्तरावरिल ज्युडो रेफरी ओमप्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजूजी कारवटकर, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले , पर्यवेक्षक विनोदजी नांदुरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ओमप्रकाश पवार म्हणाले की, उन्हाळी शिबिरात मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. ज्ञानाचे आदान – प्रदान होते म्हणूनच शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया ठरतो. आयुष्याची जडणघडण येथेच होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजूजी कारवटकर म्हणाले की उन्हाळी शिबिरे मुलांना आत्मविश्वास, स्वातंत्र्य, सामाजिक कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित करण्यास सक्षम करतात. उन्हाळी शिबिर हा मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खास तयार केलेला कार्यक्रम आहे. ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आमच्या शाळेने 22 एप्रिल ते 04 मे 2024 या कालावधीत उन्हाळी शिबिर आयोजीत केले. या वर्षीच्या उन्हाळी छंद शिबीरामध्ये कला आणि हस्तकला, क्रीडा, योग, व लाठी प्रशिक्षण , संगीत, अक्षर लेखन , संगणक ज्ञान इत्यादींचा समावेश आहे. व्यक्तिमत्व विकास आणि छंद जोपासण्यावर लक्ष केंद्रित करून हे उन्हाळी छंद शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून व रोप मलखांब याचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाकरिता क्रीडा शिक्षक श्री. विनोद कोसुरकर, अभिजित धाईत, श्री.चांभारे ,कु.संजना चौधरी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व या उन्हाळी छंद शिबिरा करिता सहभागी असलेले 150 विद्यार्थी उपस्थित होते. संचालन काला शिक्षक श्री. मिलिंद सावरकर यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक श्री. विनोदजी कोसुरकर यांनी केले