भारत गौरव गणाचार्य श्री 108 विरागसागर जी महामुनिराज (32) साधूंचे यांचे ठिकठिकाणी स्वागत
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट सकल जैन समाजातर्फे सत्य, अहिंसा आणि शांततेचे प्रणेते भगवान महावीर स्वामी यांची 2623 वी जन्म कल्याणक महोत्सव आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. जैन समाजाच्या लोकांनी रविवारी सकाळी मंदिरांमध्ये भगवान महावीरांचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासोबतच रविवार, 21 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता आंबेडकर चौकात प.पू. भारत गौरव गणाचार्य श्री 108 विरागसागरजी महामुनिराज (ससंघ) 32 पिच्छि चे हिंगणघाटमध्ये प्रथमच मंगलप्रवेश झाल्यानंतर गुरू-शिष्य भेट झाली. गुरु गणाचार्य श्री 108 विरागसागर महाराज आणि शिष्य मुनिश्री विशेषसागरजी महाराजांची 10 वर्षांनंतरची वात्सल्य मिलन हा अद्भूत आणि भावनिक क्षण होता. गुरूंच्या भेटीनंतर मुनी संघाने पाद प्रक्षालनकरून आशीर्वाद घेतले. यानंतर जैन मुनिचे शहराकडे निघाले आणि श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात आगमन झाले.
महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून कारंजा चौक, श्री दिगंबर जैन मंदिर व श्री विमलनाथ जिनालयाला दर्शन केले. जैन मंदिरांमध्ये मस्तकाभिषेक व अष्ट द्रव्यांसह पूजा-अर्चना करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत बँड पथक, हत्ती, घोडे, बग्गी, भगवान महावीरांचा सजवलेला रथ, जैन धर्माशी आणि भगवान महावीर स्वामी यांचे चरित्र संबंधित झांकीचा समावेश होता. समाजातील श्रावक-श्राविक भगवान महावीर यांचा जयघोष करत चालत होते. वंदे वीरम्च्या जयघोषाने पार्श्वनाथ जैन मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. छत्तीसगढ़ रत्न शिरोमणि गुरूवर्या श्री मनोहरश्रीजी म.सा. चे सुशिष्या साध्वी सुमित्राश्रीजी म.सा., साध्वी प्रियमित्राश्रीजी म.सा. आणि साध्वी मधुस्मिताश्रीजी म.सा. आदि ठाणा 3 चे प्रवचन व मांगलिक संपन्न झाले.
जीवदयासोबतच मानवसेवेचा कार्यक्रम म्हणून श्री आनंदधाम जैन कटारिया भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता कारंजा चौकात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कचहरी समोर भारतीय जैन संघटना संचलित थंड पाण्याच्या प्याऊ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून लहान मुले व महिलांनी विविध धार्मिक वेशभूषा, भाषणे, कविता आणि भक्तिगीते कार्यक्रमांचे आयोजन श्री प्रभु भक्ति मंडल तर्फे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. सुधीर कोठारी, दिनेश कोचर, भागचंद ओस्तवाल, राजेंद्र डागा, संजय जैन, संजय साखरे, प्रकाशचंद कोचर, राजेंद्र दोषी, विनोद पोतदार, हरीश कासवा, शांतिलाल कोचर, नरेंद्र बैद, गिरीष कोचर, किशोर कोठारी, शिखर मुणोत, राजेश बांडे, अमोल बिडकर, राजेश कोचर, मिलिंद जैन, संदीप विंदाने व श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सर्व श्रावक व श्राविका उपस्थित होते. ही माहिती राजेश अ. कोचर यांनी दिली.