मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथील रमेश चालूरकर यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. प्रिती यांचा विवाह चंद्रपूर जिल्ह्यातील शिवाजी चौक बाबूपेठ येथील नारायणराव गुरले यांच्या कनिष्ठ चिरंजीव रुपेश यांच्या विवाह अहेरी येथील इंडियन पॅलेस हॉल येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीता चालूरकर, माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.