संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल राजुरा ही शाळा राजुरा शहरात विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास नावाजलेली आहे. शाळेतील केजी टू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर ग्रॅज्युएशन डे चा सोहळा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन डे सर्टिफिकेट देऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी छान गाण्यांचे सादरीकरण केले तसेच शाळेविषयी आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्गाने त्यांचे शाळेविषयीचे मनोगत सादर केले आणि शाळा ही कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा राखण्याचे काम करते याविषयी आवर्जून त्यांचे मनोगत मांडले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंगापूर प्याटर्न वर आधारित शिक्षण या शाळेतून दिले जाते.
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कुल येथे प्ले स्कुल ते वर्ग एक पर्यंतचे वर्ग या शाळेत असून अगदी लहान मुलं अभ्यासा व्यतिरिक्त रंग, आकार, दिवस, वार, महिने तसेच प्रत्येक संस्कृतीवरील विविध सणसमारंभ प्रत्यक्षपणे उपक्रमाच्या माध्यमातून राबवून त्याविषयीची माहिती अनुभवतात. बालवयातच हसतखेळत व विविध उपक्रमांच्या साह्याने शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे.
याकरिता या शाळेचे सल्लागार सदस्य श्री संदीप मालेकर सर आणि सौ जयश्री मालेकर मॅडम तसेच केंद्र संचालक एडवोकेट मनोज काकडे व ब्रँच इंचार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, पूजा इटनकर, आयेशा कुरेशी, प्रीती सिंग आणि पूजा सिंग यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात. याकरिता ममता व अर्चना या मदतनीस चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये पालक वर्गणी शाळेमध्ये विविध उपक्रमातून मुलांना शिक्षण दिल्या जाते याबाबत स्तुती केली.