प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुदपुर:– तालुक्यात जाम येथील पिवी टेक्सटाईल्स मध्ये इंटकचे महासचिव आफताब खान यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघ येथून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या समर्थनार्थ एक प्रचार सभा घेतली.
कामगार नेते व राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे महासचिव आफताब खान यांनी आज दि 24 एप्रिलला कामगारांच्या बैठकित मार्गदर्शन करतांना ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्वाची असून भाजप सरकार यांनी कामगारांच्या विरोधात अतिशय कठोर कायदे तयार करून भांडवलदार धार्जीने कायदे करून कामगारांना गुलाम करण्याचे षडयंत्र रचलेले आहे. याविरुद्ध कामगारांना जागृत केले. कामगार हितैशी सरकार केंद्रात आणून कामगारांच्या हिताची रक्षा करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या युनिट मध्ये सहा हजार कामगारांना काम करीत असून बहुतांश कामगारांनी आफताब खान यांच्या आवाहना नुसार अमर काळे यांना समर्थन देण्याचे मान्य केले. यावेळी सर्व कामगारांनी अमर काळे यांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कामगार सर्वश्री बंडू काटवले, दिगंबर नवघरे, संतोष माथनकर, प्रभाकर देवतले, जीवन दलाल, नितीन कांबळे, विनोद गोटे, सचिन शेंडे, चनकांपुरे इत्यादी उपस्थित होते.