पल्लवी मेश्राम, उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- हिंगणघाट येथील एकाची 2 कोटीची फसवणूक करतात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यात पोलिसांनी धडक कारवाई करत 4 आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
फिर्यादी जयेश चंदाराणा रा. हिंगणघाट, जि. वर्धा याने गणेशपेठ, नागपूर शहर येथे आरोपी विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. यावेळी ८७/२०२३ कलम ४२०, ४०६, १२० (ब), ३४ भा.दं.वि. गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी धडक कारवाई करत १) गणपतसिंग भिमसिंग राजपुत, वय ३४ वर्ष, रा रामनगर, ता. सुमेरपुर जि. पाली राज्य- राजस्थान २) ललीतसिंग लक्ष्मणसिंग राजपुरोहीत, वय ३२ वर्ष, रा. ता. सुमेरपुर जि. पाली, राज्य- राजस्थान ३) अमन राधेश्याम भारती गिरी, वय २९ वर्ष अंदाजे रा. मुंबई. कायमना पता-आराजी कोडरी, पोस्ट सिंगारपुर जि. गाजीपुर, उ.प्र. ४) ताहा खान वल्द जलील अहमद उर्फ सुलतान रा. क्रॉफर्ड मार्केट मुंबई ५) विलास उर्फ कैलाश गणपत नरवाडे, वय ४० वर्ष, रा. नारायणवाडी नारायण गाव, ता. जुन्नर जि. पुणे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, यातील आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी नामे जयेश चंदाराणा वय ४९ यांना ट्रेड प्रॉफित फंड (तीपीएफ) नावाचा फंड हया कंपनी मध्ये आपण जर नगदी २ करोड रूपये दिले तर आपणास ही कंपनी आर.टी.जी.एस. व्दारे ३.२० करोड रूपये आपले बँक खाते मध्ये टाकतात असे खोटे आश्वासन दिले. फियांदी यांना नगदी २ करोड रुपये जमा करायला लावुन ते ठरलेप्रमाणे आरटीजीएस द्वारे फिर्यादीच्या खात्तेवर परत जमा न करता तेथील कार्यालयातील लोकांनी व मुंबई स्थित इसमांनी सदरचा व्यवहार जणुकाही बनावट नसुन खराच आहे असे दर्शवुन सर्वांनी एक परीपुर्ण योजना आखून संगणमताने फसवणुक केलेली आहे. त्यानुसार पोलीस ठाणे गणेशपेठ, नागपूर शहर अपराध क्र. ८७/२०२३ कलम ४२०, ४०६, १२० (ब), ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी ४ आरोपी अटक असुन त्यांचेकडून अद्याप पावेतो एकूण रु ८० लक्ष चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे विलास उर्फ कैलाश गणपत नरवाडे, रा. नारायणवाडी नारायण गाव, ता. जुन्नर जि. पुणे याचा ठावठिकाणाचा तांत्रीक तपास व गुप्त माहिती प्राप्त करून सपोनि सागर आव्हाड, पोहवा पंढरी, पोशि रवि जाधव, व चालक पोहवा विजय ठोंबरे, आर्थिक गुन्हे शाखा, नागपुर शहर यांनी नारायणवाडी नारायण गाव, ता. जुन्नर जि. पुणे येथे जावुन शोध घेतला असता सदर आरोपी गिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन आरोपीस नागपुर येथे घेवुन आले व अटक करून पीसिआर कामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई मा. पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सागर आव्हाड आणि पथकाने केली आहे.