अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लग्न प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचां आनंदाचा क्षण, महत्वाचा प्रसंग, परंतु त्याही पेक्षा जास्त महत्वाचे आपल्या राष्ट्रप्रती दायित्व, आपल्या देशप्रती कर्तव्य. ह्याच विचारधारेला घेऊन हिंगणघाटच्या एका नवरदेवाने लग्ना आधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लग्नमंडपात जायच्या आधी, वरात काढण्याआधी, घोडे वर बसण्या आधी नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि त्याने आपल्या मतदानाचां हक्क बजावला.
जगदीश वैद्य सिव्हिल इंजिनियर राहणार गणेश नगर हिंगणघाट यांनी २६१ मतदान केंद्र हिंगणघाट इथे लग्ना पूर्व आपल्या मताधिकारचा हक्क बजावला. २६ ला वर्धा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्पेचे मतदान झालं. या लोकशाही पर्वावर हिंगणघाट शहरतील नवरदेवाने आपले कर्तव्य बजावले.
महाराष्ट्र मध्ये लोकसभाच्या दुसरे टप्पे चे मतदान पार पडले. सकाळ पासूनच युवा, बुरजुर्ग, मध्यमवयीन नागरिक, मतदान करण्यास उस्तुक दिसले. इतकेच नव्हे तर दिव्यांग नागरिक देखील आपल्या मतदानाचे कर्तव्य निभावताना दिसले. यासोबत गिरड येथील दिनेश बावणे या नवरदेवाने देखील मतदान केल्या नंतरच लग्न केले. शेरवानी, डोक्यावर पगडी, अश्या वेशभूषे मध्ये एक युवक मतदान केंद्रावर आल्या नंतर सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. या दिनेश बावणे नामक नवरदेवाने लग्न मंडप मध्ये जाण्यापूर्वी मतदान केंद्र वर गेला आणि त्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केले, असे यावेळी त्याने सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकांनी मतदानचा हक्क बजावावा असे आवाहन केले. या नवरदेवाचा अश्या प्रकारे आपल्या मताधिकार प्रती दाखविलेला उत्साह सर्व साठी प्रेरणा दाई ठरला.