अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा इ. ८ वी (NMMS) २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत गोमुख विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदागोमुख तह. सावनेर या शाळेने आपल्या उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या परिक्षेत शाळेचे २१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहे.
सदर परीक्षेत ऐश्वर्या पांडुरंग चांदेकर, हिमानी युवराज निखाडे, प्रेरणा वासुदेव आसोले, वेदांती रविन्द्र चिकटे, शर्वरी चंद्रशेखर वंजारी, देवयानी अनंता मोवाडे, श्रावणी राजेश गडेकर, अक्षरा श्रीराम घुगल, तनूजा श्रीकांत मोहतकर, रेवती लीलाधर उमाठे, मानसी खुशाल झाडे, उत्कर्षा दिलीप बावनकर, रितीका भाऊराव धुर्वे, रिद्धी रामदास रोकडे, कल्पना युवराज मडके, वेदान्त दिलीप घुगल, आयुष रामेश्वर भुतमारे, लोकेश पांडुरंग मदनकर, क्रिश दिवाकर मरसकोल्हे, महेश संजय निखाडे, सुजल संजय चांदेकर या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये इ.१२ वी पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यावेळी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. नेमराजजी मोवाडे, सचिव प्रा.दिनकरराव जिवतोडे, मुख्याध्यापक महादेवजी खरबडे, ओमप्रकाश मोवाडे सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडीलासह मार्गदर्शक शिरीष रंडखे, अनिता घोरमारे, पुष्पांजली जोगी व हर्षा वंजारी यांना दिले.