मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आपण अनेकदा रापम च्या बस ने प्रवास करतो प्रवासाचे तिकीट काढताना चिल्लर पैसे नसेल तर ते तिकिटाच्या पाठीमागे लिहून नंतर देतो असे वाहक सांगतात. तर कधी पैसे घेण्याचे विसरून गेल्याच्या पण अनेक घटना घडत असतात. चालत्या बस मध्ये उर्वरित पैसे मागीतले की वाहक हुज्जत घातल्याच्या पण घटना घडल्या आहे. अशीच घटना प्रवासी मोहन तिनगसे यांच्या बरोबर घडली आहे.
दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हिंगणघाट ते उमरेड बस क्रमांक एमएच 40 एन- 8722 या बसने मोहन तिनगसे हे सिर्सी येथे जाण्याकरीता सकाळी लालपरी बसने प्रवास करीत असतांना कर्तव्यावर महिला वाहक सुवर्णा साठोणे यांना 500 रुपयांची नोट तिकीट काढण्यासाठी दिली. त्यावेळी त्यांनी मोहन तिनगसे यांना सिर्सी चे तिकीट 60 रुपयांचे देऊन सुटे 40 रुपये परत करत उर्वरीत 400 रुपये तिकीटचे मागचे भागाला लिहून दिले,
त्यानंतर चालत्या बसमध्ये मोहन तिनगसे यांनी दोनदा एस. एम. साठोणे महिला वाहक यांना तुमचे कडे सुटे पैसे आले आहे तर 400 रुपये परत करा असा आग्रह केला तेव्हां त्यांनी मला तुमचा स्टाँप आलेवर उर्वरित पैसे परत करील कशाला गडबड करता. बसमध्ये अनेक प्रवासी आहे तुमचेचं पैसे थोडी परत करायचे आहे बाकीचे लोकांनाही पैसे द्यायचे आहे म्हणतं महिला वाहक यांनी मला उध्टात भाषेत उत्तर देत जर कां परत पैशासाठी ऐवढीच घाई असते तर चिल्लर पैसे देत जावे. जेव्हां मला वाटेलं तेव्हा देईल स्टाँप येऊ दे म्हणून 400 रूपये देण्याचे टाळाटाळ केली.
त्यानंतर मोहन तिनगसे यांनी सिर्सी गाव आल्याने उर्वरित बाकी रुपयांची मागणी केली, तेव्हां तु घाई करते माझा अपमान प्रवासी लोकांन समोर केल्याने तुझे रुपये नाही दिले तर तु काय करशील म्हणतं वादावादी करायला लागली व म्हणाली कि मी महिला वाहक आहे तुझे विरोधात पोलीस तक्रार दाखल करतो अशी धमकी दिली, मी एक सभ्य प्रवाशी नागरिक असल्याने व माझे कर्तव्यावर जाण्यास वेळ झाल्याने वाद टाळत रुपये परत न घेता बसने उतरल्यावर निघून गेलो. असे प्रवाशी मोहन तिनगसे, हिंगणघाट यांनी सांगितले.
त्यानंतर मोहन तिनगसे हे कर्तव्यावरुन परत हिंगनघाट येथे आल्यावर त्यांनी महिला वाहक सौ. सुवर्णा साठोणे यांची तक्रार व तिकीटाचे प्रत जोडून हिंगणघाट परिवहन डेपो व्यवस्थापक यांचे कडे माझे 400 रुपयांची मागणी केली. तेव्हां महिला वाहक सौ. एस.एम. साठोणे यांना माझा अधिक राग आला कि, तु आगार प्रमुखाकडे माझी तक्रार केली आता तु आपली नौकरी कशी करते बच्चू मी ही महिला आहे महिला सोबत गाठ पडली कि महिला मनुष्याला नेस्तनाभूत करु शकते हा आजवरचा इतिहास आहे असे म्हणतं उलटे माझेचं नावाची तक्रार पोलीस स्टेशन हिंगनघाट येथे केली.
जर मी तिचे सोबत अपमानस्पद शब्द वापरला असता तर तिने सिर्सीला पोलीस स्टेशनला बस नेऊन माझी तक्रार कां नोंदविली नाही. असे रास्त मत विदर्भ मतदारचे तालुका प्रतिनिधि यांचे कडे व्यक्त करीत मोहन तिनगसे म्हणाले कि काही महिला वाहक वरची कमाई करण्यासाठी अनेकांचे सुटे रुपये बसस्टाँप येई पर्यन्त यासाठी देत नाही कि जर कां प्रवाशी एखादी गडबड घाईत असला कि उतरतांना आपले पैसे विसरला कि यांची कमाई होते त्यासाठी ते असे प्रकार करतात. त्यातील हा भाग असावा व माझे सारखे शिक्षीत प्रवाशी असलेल्या सोबत हा प्रकार घडत असेल तर अडाणी असलेल्या किती लोकांचे रुपये पैसे हे कमाईचे साधन होतं असेल असाही तर्क वितर्क काढल्यास अतिशोक्ति ठरु नये.
महिला म्हणून महिलांचे कायदे असल्यामुळे महिला अनेक आरोप-प्रत्यारोप करु शकतात तेव्हां पुरुषांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न सुध्दा उपस्थित होतो.