Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 16, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिकः- शहरात मोठ्या प्रमाणात चोरीचा घटनेत वाढ झाल्याचे मागील अनेक घटनेवरून दिसून येते आहे. त्यात काल पुन्हा एक घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. वकीलवाडी येथील एका संकुलातील मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे फसल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी दि.15 मध्यरात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली. मोबाइल दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सुरक्षारक्षकाने धाव घेताच चोरटे कारमधून पसार झाले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मोबाइल व अ‍ॅक्सेसरीज विक्रीसाठी वकीलवाडी, एमजी रोड परिसर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बहुतांश मोबाइल विक्री, दुरुस्तीची दुकाने आहेत. ग्राहकवर्ग अधिक असल्याने व्यावसायिकांनीही दुकानात महागडे मोबाइल, अ‍ॅक्सेसरीजचा माल भरलेला आहे. या आधीही शहरातील मोबाइल विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाइल चोरून नेले आहेत. त्यामुळे चोरट्यांच्या रडारवर ही दुकाने असल्याचाही संशय होता. मध्यरात्री 1.30 ते 1.45 च्या सुमारास एका कारमधून चौघे चोर वकीलवाडीत आले. त्यांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर कार उभी करून त्यातून तीन चोरटे खाली उतरले व त्यांनी मोबाइल दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आवाजाने पहिल्या मजल्यावर असलेला सुरक्षारक्षक सतर्क झाला व आरडाओरड करीत पुढे आला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.

त्यापैकी एक चोरटा उलट दिशेला धावला, एक चोरटा कारमध्ये बसला व एक धावत्या कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. घटनेची माहिती कळताच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. दुकानमालकास माहिती मिळाल्यानंतर तेदेखील तेथे आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

अस्वलीच्या हल्ल्यात इसम जखमी, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दवाखान्यात जाऊन केली विचारपुस व आर्थिक मदत केली.

Next Post

महाराष्ट्रातील कातकरी समाजाचे कोणतेही अस्तित्व नाही, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धोरण ठरवा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्रातील कातकरी समाजाचे कोणतेही अस्तित्व नाही, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धोरण ठरवा.

महाराष्ट्रातील कातकरी समाजाचे कोणतेही अस्तित्व नाही, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धोरण ठरवा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In