मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- रस्ते विकासाच्या धमन्या समजल्या जातात, रस्त्यावरून देशाची संकल्पना ठरविली जाते स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाऱ्या देशात नागरिकांना जायला धड रास्ता नाही, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही लोकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशात दरवर्षी कोट्यवधीचा खर्च रस्त्यांच्या बांधकामावर होतो. काही ठिकाणी सिमेंटीकरणावर डांबरीकरण तर काही ठिकाणी रस्त्यावर रस्ता तयार करून निधीची उधळपट्टी केली जाते. अशात आदिवासी बहुल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कसनसुर ते कोटमी या रस्त्याला मांजरी मिळून सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत डांबरीकरण करण्यात येत आहे परंतु सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने कामाची चौकशी करावी अशी मागणी सदर परिसरतील नागरिकांनी केली आहे
मागील अनेक दिवसांपासून कसनसुर-कोटमी रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती.त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. व कंत्राटदारा मार्फत कामाला सुरुवात केली परंतु कंत्राटदारामार्फत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्या जात आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्न निर्माण होत आहे
सदर परिसर आदिवासी व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो यात सदर परिसरात अनेक वर्षांपासून महामंडळाची बस येत नव्हती परंतु पोलीस विभागाच्या प्रयत्नाने बस सुरू झाली. सदर रस्ता कसनसुर कोटमी रेगडी समोर चामोर्शी कडे निघतो त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते त्यामुळे रास्ता सुरळीत असावा या करिता शासनानी रस्त्याला मंजुरी दिली रस्त्याचे काम सुरू होऊन संपुष्टातही येऊन राहिले मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे,परंतु झालेल्या डांबरीकरण चार दिवसातच उखळून खाली असलेली माती वर येऊन राहिली आहे त्यामुळे या झालेल्या रस्त्याचे काम किती दिवस टिकणार असा प्रश्न केला जात आहे सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पक्या रस्त्याचे स्वप्न धुळीला: तालुक्यातील कसनसुर ते कोटमी या नऊ किलोमीटर मार्गावर असलेल्या गावांना अनेक वर्षानंतर खराब झालेल्या रस्त्याचं काम होत होता. हा रस्ता व्हावा म्हणून अनेक वेळा येथील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मोठ्या संघर्षानंतर सुरू झालेल्या या नऊ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर, ही झालेल्या कामाची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. निकृष्ट होत असलेल्या रस्त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पक्क्या रस्त्याचे स्वप्न धुळीला मिळत आहे.
परिसर नक्षलग्रस्त असल्याचा फायदा: सदर परिसर नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील आहे,आणि परिसरात पायाभूत सुविधांची वाणवा आहे,त्यामुळे या परिसरात वरिष्ठ अधिकारी फिरकून पाहत नाही आणि याचा फायदा येथील कर्मचारी व कंत्राटदार घेत आहेत त्यामुळे सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप नागरिकांनी केली आहे