✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
ठाणे:- शहर आणि परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून आता अजुन पावसाने जोर पकडला आहे. पावसाच्या संततधारेमुळे शहरात महामार्गावर तसंच विविध ठिकाणी पाणी साचले असून वाहतुक कोंडीही झाली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर माजीवडा ते भिवंडीतील रांजनोली पर्यंत कोंडी आहे. ठाणे महापालिका मुख्यालय परिसरातही पाणी साचले आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा थांब्यावर प्रवाशांसाठी रिक्षा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहे