अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गिमाटेक्स वणी युनिट येथिल कामगार स्व.सुनील बोरघरे हे मेंन्टनस कॉटन विभागात कामगार म्हणून कार्यरत होते. काही अपरिहार्य कारणास्तव त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष आ. समिर कुणावार व संघटनेचे पदाधिकारी यांनी गिमाटेक्स व्यवस्थापना कडे पाठपुरावा केला. या मागणी पाहून सर्व कार्यरत कामगारांच्या पगारातुन प्रती कामगार १०० रूपये प्रमाणे कपात करून एकुन १ लाख ४२ हजार रुपयांच्या रोख रकमेचा धनादेश मृत कामगाराचे कुटुंबीयांना देण्यात आला.
यावेळी जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे, दामोदर देशमुख, जिवन भानसे, मनोज जुमडे, विनोद कावळे, श्रावण थुटे, जयंत बावणे, दिवाकर बरबटकर, राकेश तराळे, प्रशांत शेळके, विजय थुल, विनोद कोल्हे, लक्ष्मण जयपुरकर, राहुल देशमुख, हेमंत भगत इत्यादीसह बोरघरे कुटूंबातील सदस्य, मील मजूर कामगार व पदाधिकारी उपस्थित होते.