Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गडचिरोली: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले, पोलीसांनी 14 जणांना ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 4, 2024
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले, पोलीसांनी 14 जणांना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातून संपूर्ण राज्याला हादरविणारी घटना समोर आली आहे. पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा होत असताना जादुटोण्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जीवंत जाळल्याची घटना 1 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मृतका मध्ये जमनी देवाजी तेलामी असं 57 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर या महिलेबरोबर आणखी एका व्यक्तीला जाळण्यात आलं त्यांचं नाव देवू कटिया अतलामी असून त्यांचं वय 57 वर्ष होतं.

बरसेवाडा गावात 1 मे च्या रात्री पंचायतीची बैठक झाली त्यावेळीजमनी यांचे भाऊ सादू मासा मुहोंदा हे देखिल त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळंच हे सर्व प्रकरण समोर आलं. बहीण जमनीला ग्रामस्थांबरोबच कुटुंबीय देखिल मारहाण करत असल्याचं पाहून सादू यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण जमावानं त्यांच्या अंगावरही पेट्रोल ओतलं, त्यामुळं घाबरून सादू तिथून पळून गेले.

जमनी तेलामी हिच देवू कटिया अतलामी हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले, तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे ते जादुटोणा करतात, असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा- चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिनाभरापूर्वी एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा १ मे रोजी मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू जननी तैलामी आणि देवू आतलामी यांनी जादुटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन 1 मे रोजी रात्री जननी आणि देवूच्या घरी गेले, त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले. त्यात गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी 14 जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली. घटनेनंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाच महिन्यातील दुसरी घटना: जादुटोण्याच्या संशयावरुन हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती, पत्नी आणि त्यांच्या नातीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातही मृतांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली होती. हे गावसुद्धा एटापल्ली तालुक्याच्या सीमेवर आहे. या घटनेनंतर आता बारसेवाडा येथे हत्याकांड झाल्याने जिल्हा हादरला आहे.

Tags: गडचिरोली जिल्हाजादुटोणाजादुटोणा संशयावरुन दोघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले
Previous Post

हिंगणघाट: गिमाटेक्स वणी युनिटच्या दिवंगत कामगाराच्या कुटुंबीयांना मदतीचा हात.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वतीने हिंगणघाट येथे प्रमुख पदाधिकारी व बूथ अध्यक्षाची आढावा बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वतीने हिंगणघाट येथे प्रमुख पदाधिकारी व बूथ अध्यक्षाची आढावा बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वतीने हिंगणघाट येथे प्रमुख पदाधिकारी व बूथ अध्यक्षाची आढावा बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In