मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणूकिसाठी 26 एप्रिलला मतदान झाले आणि उमेदवाराचे भाग्य मतपेटीत बंद झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवारात सळर टक्कर असल्याची चिन्हं नागरिकाच्या बोलण्यातून व्यक्त करण्यात येत आहे.
दिनांक 26 एप्रिल ला झालेल्या वर्धा-लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी व बूथ अध्यक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश सरचिरणीस अतुल वांदीले यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला. तसेच याप्रसंगी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.या आढावा बैठकीचे आयोजन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले.
यावेळी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रांतील सर्व प्रमुख पदाधिकारी व बूथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुक सह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.