अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्व. अमित नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही भारतीय संघटना हिंगणघाट द्वारा 1 में 24 ला कामगार दिनाचे औचित्य साधून दुर्गा मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात शहरातील 32 रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले.
या भव्य रक्तदान शिबिरा प्रसंगी कस्तुरबा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथील रक्तकोष विभागाला पाचरण करण्यात आले होते. डॉ सौं विभा इंगोले व चमू यांनी रक्त तपासणीचे उत्तम कार्य केले. या शिबिराला येथील हृदयरोग तज्ञ डॉ निर्मेश कोठारी, नायब तहसीलदार श्री सागर कांबळे, पी. एस. आय संदिप तराम, डॉ. नंदनवार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून रक्तदान केले. तसेच स्व. अमित नाईक यांच्या पूर्ण परिवाराने शिबिरास भेट दिली व समाधान व्यक्त केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोहन कठाणे, गुणवंत ठाकरे आणी संपूर्ण आम्ही भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी व सहयोगी सदस्य यांनी परिश्रम घेतले.