अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीज येथे भिषण आग लागली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना गेल्या शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.
वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीज येथे भिषण आग लागली. ही आग कंपनीच्या इंजिनिअरिंग विभाग मध्ये लागली असून यात कंपनीचे 95 लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गिमाटेक्स कंपनीला आग लागल्याचे निदर्शनास येताच येथील सुरक्षा रक्षकांनी आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे स्वरूप गंभीर असल्याने समजताच हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर हिंगणघाट अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सदर घटनेची दि. 04 रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असुन हिंगणघाट पोलीस पुढील तपास करीत आहे.

