संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील चेक तळोधी, भंगारपेठ, मक्ता, पिपरपेठ, नंदवर्धन, शिवणी देशपांडे, उंदिरगाव येथे दौरा करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी जल जीवन च्या कामामुळे खराब झालेले रस्ते, नाल्या, पांदन रस्ते, बसेसची कमतरता, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई अशा विविध स्थानिक समस्यां बाबत आमदार सुभाष धोटे यांच्याशी चर्चा केली. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. धोटे यांनी दिले.
या प्रसंगी श्रीनिवास कुंदनुरीवार, विपिन पेदुलावर, लहुजी ढपकस, गिरमाजी ढपकस, नामदेव ढपकस, अनिल ढपकस, अशोक फलके, सत्यवान कुबडे, सुनिल ढपकस, तेजराज रामगिरकार, भय्याजी तारोडे, काशिनाथ पोटे, रविंद्र ठुसे, विनोद नागपुरे, सुनिल कूडे ग्रा. प. सदस्य बाबाजी कुडे, संजय भोयर, भूपेंद्र आक्केवार, बाळू विरुटकर, अरविंद जुनारकर, राजू झाडे, माजी सरपंच लालिताबई वनकर, ग्रा. प. सदस्य माधुरी दुधकोहर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.