मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात बेवारस कुत्र्यांची हौदास घातला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज दिनांक १३ मे ला रामनगर येथील रहिवासी ह्यांनी कुत्र्यांपासून लहान मुलानं आणि नागरिकांना रात्री बेरात्री होणारा त्रास व साशक्य जीवित हानी बाबत हिंगणघाट नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले गेले.
या निवेदन म्हटल आहे की, प्रबुद्ध नगर येथील दिवसा तसेच रात्री-बेरात्री सैरावैरा फिरणारी गावठी मोकाट कुत्र्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. ह्याचे एक कारण म्हणजे काही स्थानिक लोकांकडून बेवारस कुत्र्यांना अन्न आणि बिस्किटे चे प्रलोभन मिळत असल्यामूळे इथे कुतत्र्यांची जास्तच वर्दळ वाढली व एकाच रोडच्या गल्लीत संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आहे.
त्यापैकी ह्या परिसरात कुत्र्यानी १० वर्ष खालील लहान दोन भावंडाना (भाउ-बहीण) ह्याअगोदर चावा घेतला; परंतु पालकांनी वेळीच इंजेक्शन घेतल्यामुळे हानी टळली. काही नागरिक चावातून बचावले. ह्या प्रभागात लहान मुले संध्याकाळी खेळताना धावतात तसेच जेव्हा नागरिक वाहनांनी प्रवास करतात तेव्हा कुत्री त्यांच्यावर आक्रमक होतात आणि पाठलाग करतात. त्यातून विशेषतः लहान मुले, स्त्रीया आणि इतर वृद्ध नागरिक ह्यांना कुत्री चावून रेबीज सारख्या आजारानी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच प्रमाणे रात्री कुत्र्याची संख्या एकत्र होऊन एकच गल्लीबोळात जवळ जवळ ३०-४० पर्यन्त गेली म्हणजे रात्रीलां भयावह परिस्थिती निर्माण होऊन झोपमोड तर होतेच शिवाय इतकी मोठी संख्या पाहून दहशतही पसरते.
नगर पालिकेच्या धोरणानुसार काही महिने अगोदर भटकंती कुत्र्यांचा बंदोबस्त होणार असे समजले. त्यामधे प्रामुख्याने फक्त कुत्र्यांचे प्रजनन थांबवायचे उपायच होते पण त्यावर अजूनही कुठली उपाययोजना पूर्णपणे अमलात आलेली दिसत नाही. हि योजना सुरू होताच मध्ये आचारसंहितेत बंद पडली. एकंदर बघायचे झाल्यास आता एक वेगळीच परिस्तीती निर्माण झालेली दिसत आहे. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्र्वानांची संख्या एक वर्षात ५ पटीने वाढते आणि गतवर्षी फक्त ६०० कुत्री स्टरेलाइज केली गेली आणि मध्येच येजना थांबवली गेली असे नगरपालिकेच्या स्वास्थ्य विभागाकडून कळते.
हल्ली पावसाळ्याच्या तोंडावर ह्यासंबंधी होणारे अपघात आणि चावा होणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्ये नगरपालिका ह्या विषयाला कसे हाताळते हे महत्वाचे दिसते. एका वेळी कुत्र्यांची संख्या आवाक्या बाहेर गेल्यानंतर नागरिकांचे दिवस आणि रात्रीचे जगणे कुत्र्यांमुळे खूपच कठीण होईल असे चित्र येत्या एक दोन वर्षात पुढे येईल असे चित्र दिसते. निवेदन देताना प्रबुद्ध नगर येते राहत असणारे प्रामुख्याने सुधीर रिंगणे, पराग चंदनखेडे, विजय भस्मे, अमित नगरवार संदेश मून हे उपस्थित होते.

