पुलगाव रुग्णालयातील प्रकार, रुग्णालयात 102, 108 रुग्णवाहिका उभ्या असताना, परिवाराचा व विदर्भ प्रमुख अंकुशभाऊ कोचे यांचा रुग्णालयाविरोधात रोष.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पुलगाव येथून आरोग्य विभागाचे धिंडोळे निघत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दि.13 मे 2024 रोजी एक वाजताच्या सुमारास उमेश रमेशराव तामगाडगे गंभीर स्थितीत पूलगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता पूलगाव ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांच्या हलगर्जी कारभार एका इसमाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उमेश रमेशराव तामगाडगे यांना गंभीर स्थितीत पूलगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता त्यांची गंभीर स्थिती बघता त्यांना मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी तातडीने घेऊन जाण्याचे कुटुंबाला सांगण्यात आले. पण पुलगाव ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्स 108 102 उपस्थित असताना डॉक्टर पझारे यांनी 108 वर कॉल करण्यास सांगितले आणि 108 वर ॲम्बुलन्स येण्यास तब्बल एक तास लागला या एक तासांमध्ये रुग्णाची यांची प्रकृती खालावली आणि रमेश उमेशराव तामगाडगे याचा मृत्यू झाला.
ग्रामीण रुग्णालयातून मुस्ताक शिवानी या व्यक्तीने सदर भीम आर्मी कार्यालयास कॉल केला आणि हॉस्पिटल येथे गेले असता रुग्ण मृत्युमुखी अवस्थेत पडून दिसला यावेळी डॉक्टर पझारे यांना विचारणा केली असता माझ्या अधीन ॲम्बुलन्स येत नाही असे त्यांनी सर्वांच्या उपस्थितीत सांगितले वरिष्ठ डॉक्टर यांना कॉल केल्या असता की डॉक्टर पझारे हे ॲम्बुलन्स देऊ शकते परंतु त्यांनी दिली का नाही, असा प्रश्न वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्णाचा व त्यांच्या नातेवाईकांना पडला डॉक्टरच्या लापरवाहीमुळे ॲम्बुलन्स न दिल्याने आज रुग्ण दगावला यामुळे ग्रामीण रुग्णालय सदर तक्रार सुद्धा देण्यात आले आणि डॉक्टरांवर कारवाईची माग करण्यात आली.
त्यावेळेस उपस्थित भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे व मुस्ताक शिवानी पेशंटचे नातेवाईक सुरेश रमेशराव तामगाडगे, अरुणा अशोक मेश्राम, सुनंदा सुरेश सोनुले, गजानन तुकाराम कांबळे, जावेद रशीद असे असंख्य नागरिक होते, व त्यांच्या मध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच , आमच्या रुग्णाचा जीव गेला असे ठोस मत परिवारणी व उपस्थित नागरिकांनि दिले आहे, शासन या प्रकरणात काय कार्यवाही करेल याकडे परिवाराचे व भीम आर्मीचे लक्ष लागले आहे. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी यावेळी दिला.