प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 12 मे रोजी वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक वर्धा नूरुल हसन यांचे संकल्पनेतून UPSC, MPSC व इतर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी पोलीस मुख्यालय वर्धा येथील आशीर्वाद सभागृह येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरामध्ये UPSC 2023 मध्ये उतीर्ण होवून वर्धा जिल्हयाचे नावलौकीक करणारे वर्धा जिल्हयातील अभय डागा हे उपस्थीत होते व श्री राहुल चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव हे उपस्थीत होते.
सदर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरामध्ये अभय डागा व राहुल चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेकरीता उपयुक्त असे मार्गदर्शन केले व त्यांचेशी संवाद साधला तसेच यापुढे सुध्दा जिल्हातील युवकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येईल.
सदर कार्यक्रमाचे यशाकरीता नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, डॉ. सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, राहुल चव्हाण सहायक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव, राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, राखीव फौजदार बानमारे, पोलीस अंमलदार निलेश कट्टोजवार, अक्षय राउत, गोविंद मुंडे व महिला पोलीस अंमलदार स्मिता महाजन तसेच पोलीस मुख्यालय येथील अंमलदार यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. सदर मार्गदर्शन शिबीरा करीता एकुण ३०० विद्यार्थी उपस्थीत होते.