सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील उजनी धरणात एक बोट बेपत्ता झाली असून ही दुर्घटना इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात घडली आहे. या बोट मधून प्रवास करणारे 6 प्रवासी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.
कळाशी येथील उजनी धरणात एक बोट पलटी झाली. या बोटीतून एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते त्यात पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झाल्यानंतर पोहत- पोहोचत कळाशी गावच्या काठावर पोहोचले आहेत. राहुल डोंगरे हे काढावर पोहोचल्यांतर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बोटीची शोधमोहिम सुरू केली आहे. या बोटीतून 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी, राहुल डोंगरे हे सुरक्षीत आहेत. मात्र, बोटीतील इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील कुगावं ते कळाशी या जलमार्गावरी ही बोट वाहतूक चालू होती. या बोटीतून एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते. गावातील जोडपे, त्यांची दोन लहान मुले, एक पोलीस उप निरीक्षक, कूगाव येथील एक तरुण आणि बोट चालक, असे 7 प्रवासी संध्याकाळच्या सुमारास प्रवास करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने ही दुर्घटना झाली. सायंकाळी सहाच्या दरम्यान सुटलेल्या वादळी वाऱ्याने बोट पलटली व सर्वच प्रवाशी पाण्यात बुडाले. यावेळी पोलीस उप निरीक्षकाने पाण्यात उडी टाकून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते पोहत-पोहोत काठावर आले. त्यामुळे, या घटनेची माहिती मिळाली. मात्र, अद्यापही बोटीतून प्रवास करणारे इतर 6 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, आता शोधकार्यासाठी प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले असून अद्याप बुडालेल्या एकाचाही शोध लागलेला नाही.