अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नांदागोमुख येथील गोमुख विद्यालयाचा इ.दहावी चा निकाल ९८.१३ टक्के लागला असून सोनाली बंडू बल्की या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण मिळवत सावनेर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
गोमुख विद्यालय येथील 10 विच्या परीक्षेत सहभागी झालेल्या १०७ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रावीण्य श्रेणीत ५१, प्रथम श्रेणीत ३४ तर द्वितीय श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.वीस विद्यार्थ्यांनी ८५ टक्के च्या वर गुण प्राप्त केले आहे.यामध्ये सोनाली बंडू बल्की ९८ %, टिंकू कृष्णदास गजभिये ९५.४०%, प्राजक्ता प्रकाश बोबडे ९४.६०%, निवेदिता गजानन मिरचे ९४.२०% , लोकेश बंडू मिलमिले ९३.८०%, अनुषा अरविंद मिरचे ९१.६०%, अंकिता दिवाकर डाखळे ९१.४०%, कुणाल बंडू बल्की ९०.८०%, समिक्षा सुभाष मिरचे ९०.४०%, प्रवीण खुशाल पोतराजे ९०.४०%, मनस्वी कमलेश डाखळे ९०.४०%, गिरीश धनराज हिंगाणे ८९.८०%, रिया किशोर बावनकर ८९.८०%, हिमांशी भीमराव मोवाडे ८९.८०%, रितिक संजय ढोके ८८%, दामिनी रविंद्र घोळसे ८७.८०%, गणेश हेमराज खाटीक ८७.८०%, प्रतिक होमदेव वाढी ८७.४०%, सोनाली पुरुषोत्तम व्यवहारे ८६.६०% गुण प्राप्त करत यश मिळवले आहे.
यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. नेमराज मोवाडे, सचिव प्रा.दिनकर जीवतोडे, सदस्य ॲड.कृष्णराव मोवाडे, मोहनराव मोवाडे, लिलाधर जीवतोडे, मुख्याध्यापक महादेव खरबडे सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.