अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- काही दिवसाअगोदर भालेराव हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.१८ टक्के लागला. यावर्षी शाळेतील २१३ विद्यार्थी प्रविष्ट झाली असून त्यापैकी २०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कृतिका चंदू ढवंगाळे – ९०.६०% गुण, यथार्थ बबलू मालेकर – ९०.४०% गुण, इशिता प्रमोद लाडेकर- ९०%, रितिका किशोर सातपुते- ८८%, रिया चंद्रशेखर वानखेडे – ८७.८०% गुण प्राप्त केले.
यावेळी हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष विजयसिंह सावजी, मुख्याध्यापिका माया रामटेके, उप मुख्याध्यापिका भारती लोणकर, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर जाधव, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार केला. यावेळी हायस्कूल विभागातील महेश देशमुख, गणेश महाजन, सुषमा पर्वते, सुनिता जुनघरे, पद्मा पोफळी, अमोल सुके, दिनेश बोबडे इत्यादी शिक्षक व पालक उपस्थित होते.

