मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील मोहता यांच्या जिनिंग मध्ये असलेल्या जलतरण तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. स्विमिंग पूल संचालक आणि ट्रेनरच्या लापरवाई मुळे एका अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलांचा जीव गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू आहे. त्यामुळे स्विमिंग पूल संचालक आणि ट्रेनरवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
हिंगणघाट येथील मोहता मिल ला लागून असलेल्या मोहता यांच्या मालकीचा जीनिंग मधील स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. रेहान शेख असे मृताचे नाव असून तो शास्त्री वार्ड हिंगणघाट येथे राहणारा आहे. ही घटना घडल्या नंतर स्विमिंग पूलचा ट्रेनर फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी जलतरण तलाव सील करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मोहता सह ट्रेनरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा: स्विमिंग पूलचे संचालक व मालक आणि ट्रेनर यांच्या लापरवाई मुळे एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे यासर्वावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.