विठ्ठल ठोंबरे, शिर्डी/ राहाता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहाता:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नांदुर ग्रामपंचायतच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.
इतिहासाच्या सोनेरी पानावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या एक कर्तृत्ववान, उत्तम प्रशासक, धर्म- संस्कृती- परंपरा यांचा कायम सन्मान करून आपले साम्राज्य समृध्द करणाऱ्या, राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णांत असलेल्या, प्रजेच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!
यावेळी उपस्थित नांदूर गावचे सरपंच विशाल गोरे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र बोरसे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत गोरे, सुनील सोडणार, नवनाथ काढनोर, अण्णासाहेब ठोंबरे, शिवाजी गोरे, दत्तात्रय गोरे, खंडेराव गोरे, ऍड. आवारे, शिवाजी गोरे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.