उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील पातूर मार्गावरील चांदूर फाट्याजवळ हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग दार्जिलिंग टी कंपनी (चहाचा कारखाना) सात मैल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस व दुचाकी मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना 30 मे गुरुवार रोजी 7.30 वाजताच्या सुमारास घडली.
पातूर मार्गावरील चांदूर फाट्याजवळ एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4354 आणि दुचाकी क्रमांक एम एच 30 एपी 4306 यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात म्हैसपुर गावातील मनोहर इंगळे हे पती- पत्नी दुचाकी जात असताना एसटी बसच्या धडकेत त्यांचा भीषण अपघात झाला आहे. मनोहर कांताराम इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीर स्वरुपात जखमी झाले आहे. 15 दिवसांपुर्वीच मनोहर इंगळे यांचे लग्न होते. दरम्यान अकोला – नाशिक बसच्या चाकाखाली आल्याने या नव्या जोड़प्यातील पतीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वांकडे हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

