हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 लागलेला निकाल 94.74% आहे. या परीक्षेकरीता एकूण 19 विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी प्रथम श्रेणीमध्ये सहा, द्वितीय श्रेणीमध्ये सहा, तृतीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे.
या गुणानुक्रमे साहिल बाबाराव मेश्राम 71% प्रथम, तंजिल आरिफ शेख 66.6% द्वितीय आणि कु. कृतिका जगदीश केशकर 65% तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यामध्ये बी.बी. भगत मुख्याध्यापक, एम.डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु.के. रांगणकर वर्गशिक्षक, आर.बी. अलाम, आर. के. वानखेडे, एस.एम. चव्हाण, एस.एन. लोधे, गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले यांचा समावेश आहे.

