हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. हल्ली चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट खूप वाढलेली आहे. याचा परिणाम पशुपक्ष्यापासून तर मानवावर होत आहे. विसापुरतील एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. देवराव बालाजी टिकले वय ६५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
शनिवार दिनांक १ जूनला सकाळी ८-३० अजयपूर येथे शेतात टिनाच्या शेडमध्ये पेंटिंगच्या काम मृत इसम देवराव व त्यांचा मुलगा राजू करीत होते. उकळा व उष्णतेमुळे त्यांना दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटत होते तिथे थोड विश्रांती घेवून घरी येण्यासाठी निघाले वाटेत मुलाने चंद्रपूरला रुग्णाल्यात नेण्याचा वडीला आग्रह करून केला परंतु त्यांनी घरी जावून गावात दाखवू असे म्हंटल्यावर ते विसापूरला आले. सायंकाळी ६ वाजता घरी पोहचल्यावर त्यांस आणखीनच अस्वस्थ वाटत होते व अंग खूप गरम वाटत होते. त्यातच भोवळ आली. त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांनी तात्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविले परंतु त्यांची प्रकृती अतिगंभीर झाल्याने लगेच डॉक्टरांनी त्यांस चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला.परंतु चंद्रपूरला पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना उष्माघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला अशी माहिती लहान मुलगा राजू टिकले यांनी दिली आहे.