पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक संतापजनक घटना घडली आहे. येथील गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका नराधम बापाने आपल्याच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहे.
एका व्यक्तीने दुसरे लग्न केले त्यात दुसऱ्या पत्नीला चार अपत्य झाले. त्यात सर्वात मोठी मुलगी 12 वर्षाची असून लहान मुलगी ही 7 वर्षांची आहे. एप्रिल महिन्यात आरोपीने घरी कुणीही नसताना मोठ्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान मुलीने याबाबत आईला सांगितल्यावर तिने नवऱ्याशी भांडण केले. दरम्यान त्याने माफी मागून यापुढे असे कधीही होणार नसल्याचे वचन दिले. त्यामुळे पत्नीने कुठेही वाच्यता केली नाही.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याने मोठ्या मुलीसह सर्वात लहान असलेल्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पत्नीला कळताच, तिने याबाबत गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.