पंकेश जाधव , पुणे जिल्हा प्रतिनिधी
बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहित चंद्रकांत जानराव वय २१ वर्षे यांस ०६ महिन्यांकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्र व पुणे जिल्हातुन केले तडीपार
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रोहित चंद्रकांत जानराव वय २१ वर्षे रा गल्ली नं.०८ शिवा टेलर्स च्या जवळ शेळके चस्ती बिबवेवाडी पुणे याचेवर बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे मालमत्ता व शरिराविरुद्ध सन २०१८ पासून ते आज पर्यंत १) सिंहगड रोड पो.स्टेशन गृ.न. २२४/२०१८ भा.द.वि.क. ३९९.४०२, मा.ह.का.क.४(२५), महा. पो. का.क. ३७ (१) सह १३५, २) विश्रामबाग पो. स्टेशन गु.र.नं. ६०२/२०१९ भा.द.वि.क. ३९२.३४, ३) बिबवेवाडी पो.स्टेशन गु.र.न. ६३०/२०२० भा.द.वि.क. ३२४, ३२६.४२७, ३४, महा.पो.अधि.क. ३७ (१) सह १२५ ४) बिबवेवाडी पो. स्टेशनगु.र.न. १७/२०२१ भा.द.वि.क. ३६३.३६६(अ), ३७६ (२)(एन) पोक्सोका. क. ४,८,१२ प्रमाणे असे एकुण ०४ गुन्हे दाखल असून त्याचेवर वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. सदर तडीपार इसमाचे त्याचे मालमत्ता व शरिराविरुद्ध केलेल्या गुन्हयांमुळे त्या परिसरातील नागरिकामध्ये दहशत निर्माण झाली असून लोकांच्या खाजगी व सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होत आहे. त्याचे लुटमार व दहशतीमुळे सदर भागात व आजुबाजूस मोलमजुरीकरून रहाणारे लोकांच्या मालमत्तेचे तसेच आर्थिक नुकसान होत आहे. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे तेथील स्थानिक रहिवाश्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असुन त्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक व इतर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो त्यांचे गुन्हेगारी प्रवृतीचे गुंड मित्रांसह नागरिकांना अडवून त्यांना मारहाण व शिवीगाळ करून त्यांना दमदाटी करत असतो. वेळप्रसंगी हत्याराचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचे कडील पैसा अडका जबरदस्तीने काढून घेतलेला आहे.त्याचे अशा दहशतीमुळे नागरीक सहसा पोलीसात तक्रार देण्यास समोर येत नाहीत. म्हणून त्याचेवर बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील सव्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक विक्रांत डिगे, सहा. पोलीस उप निरीक्षक राजकुमार बारबोले, पो. अंम दैवत शेडगे, व अनिल डोळसे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास सोंडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करुन महा. पो. अॅक्ट कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे प्रस्ताव मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती पोर्णिमा तावरे यांचे मार्फतीने मा. पोलीस उप-आयुक्त श्रीमती नम्रता पाटील परिमंडळ-५, पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांनी सदर गुन्हेगारास त्यांचे कडील तडीपार आदेश क्रमांक ४१/२०२२ दिनांक १४/०९/२०२२ पासुन ०६ महिन्यांकरीता करीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडीपार केले असून त्यास दिनांक १५/०९/२०२२ रोजी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, जि. उस्मानाबाद कार्यक्षेत्रात सोडण्यात आले आहे.तरी सदरचा आरोपी हा पुणे शहर, पुणे जिल्हयात किया बिबवेवाडी परिसरात दिसुन आल्यास तात्काळ बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर किंवा पुणे पोलीस नियंत्रणकक्ष येथे माहीती द्याथी

