प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 08-वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्या दारुण पराभव केला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निकाल घोषित केला. यावेळी विजयी उमेदवार अमर काळे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक अभय नंदन अंबास्था व दिनेश कुमार जांगीड उपस्थित होते.
उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे : अमर शरदराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), एकूण मते 5 लाख 33 हजार 106, डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी) एकूण मते 20 हजार 795, रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) एकूण मते 4 लाख 51 हजार 458, अक्षय मेहरे भारतीय (अखील भारतीय परिवार पार्टी) एकूण मते 5 हजार 467, आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी) एकूण मते 1 हजार 828, उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी) एकूण मते 1 हजार 246, कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदराष्ट्र संघ) एकूण मते 1 हजार 61, कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी) एकूण मते 1 हजार 343, दिक्षीता आनंद (देश जनहित पार्टी) एकूण मते 736, मारोती गुलाबराव उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) एकूण मते 4 हजार 672, डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) एकूण मते 797, प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) एकूण मते 15 हजार 492, रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) एकूण मते 1 हजार 438, अनिल केशवरावजी घुशे (अपक्ष) एकूण मते 1 हजार 971, अरविंद शामराव लिल्लोरे (अपक्ष) एकूण मते 1 हजार 476, आसीफ (अपक्ष) एकूण मते 15 हजार 182, किशोर बाबा पवार (अपक्ष) एकूण मते 12 हजार 920, जगदीश उध्दवराव वानखडे (अपक्ष) एकूण मते 2 हजार 349, पुजा पंकज तडस (अपक्ष) एकूण मते 2 हजार 135, ॲड. भास्कर मारोतराव नेवारे (अपक्ष) एकूण मते 4 हजार 32, रमेश सिन्हा (अपक्ष) एकूण मते 799, राहुल तु. भोयर (अपक्ष) एकूण मते 689, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव (अपक्ष) एकूण मते 1 हजार 738 व सुहास विठ्ठलराव ठाकरे (अपक्ष) यांना एकूण 7 हजार 648 मते मिळाली. तसेच एकूण 4 हजार 634 मतदारांनी नोटाला मते दिली.
वर्धा लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले. सकाळी 8 वाजता भारतीय खाद्य निगम, बरबडी रोड येथे चोख पोलीस बंदोबस्तात मजमोजणी प्रक्रियेची सुरूवात झाली. सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून अभय नंदन अंबास्था यांनी देवळी, हिंगणघाट, वर्धा व दिनेश कुमार जांगीड यांनी धामणगाव रेल्वे, मोर्शी व आर्वी या विधानसभा मतदार संघाचे काम पाहिले.