मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील जाफराबाद ते चिकेला या रोडच्या डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र या रोडचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदारा मार्फत केल्या जात आहे .
मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी या कामावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे
कंत्राटदारा मार्फत त्याचे डांबरी रोडवर डांबरीकरण करण्या अगोदर माती वरच रोडचे डांबरीकरण मारणे सुरू आहे. रोड स्वच्छ झाडला सुद्धा गेला नाही व मातीवरच थातूरमातूर डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे व निकृष्ट दर्जाचे रोडचे बांधकाम होत आहे. कंत्राटदार स्वतःच्या मर्जी प्रमाणे रोडचे डांबरीकरण दुरुस्ती करून थातूरमातूर करत आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. याकडे त्वरित वरिष्ठाने लक्ष देऊन रोडचे डांबरीकरण इस्टिमेट मध्ये आहे त्या नियमानुसारच करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
मात्र कंत्राटदार इस्टिमेट प्रमाणे रोडची डांबरीकरण न करता स्वतःच्या मताप्रमाणे करीत आहेत असा आरोप परीसरातिल नागरिक करीत आहे. त्यामुळे या रस्त्याचे भवितव्य काय असणार हे कुणी सांगू शकत नाही.