अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्यावरण विषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करावी. तसेच पर्यावरण शिक्षणही एक सातत्यपूर्ण जीवन भर चालणारी प्रक्रिया आहे व हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असावे जेणे करून पर्यावरण विषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवा मध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनते मध्ये पर्यावरण संरक्षणाची व धारणा ची ऊर्मी निर्माण करणे व विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये असावे याच उद्देशाने भारत विद्यालय हिंगणघाट येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्य मुख्याध्यापक राजु कारवटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले, सुनिल जोध, गजानन सयाम, विकास नागरकर, अतुल चिलविरवार, नेहाल गंडाईत , बालाजी आसुटकर आदी उपस्थित होते. उपस्थितानी विदयालया च्या परिसरात विविध प्रकारच्या उपयुक्त झाडाचे वृक्षारोपन केले.
भारत विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक च्या माध्यमातून जुलमी राजवटी उलथवून टाकून नवं स्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त भारत विद्यालय हिंगणघाट येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजूजी कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले, जेष्ठ शिक्षक सुनिल जोध, गजानन सयाम, त्रिशूल लोंढेकर, प्रमोद सातघरे, विकास नागरकर , हरिदास पाल, अतुल चिलविरवार, नेहाल गंडाईत , बालाजी आसुटकर आदी उपस्थित होते.