चौकशी करून कारवाई करण्याचे मागणी येरमनार ग्रामपंचायतचे माजी सरपंच बालाजी गावडे तसेच गाववाशीय केली आहे
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात विकास कामात भष्ट्राचार सुरू आहे. त्यात पेरमिली क्षेत्रतील मौजा – ताडगुडा गावात जाऊन, आरेंदा ते ताडगुडा गावाला जोडणारा रस्ताची डांबरीकारण कामाचा पाहणी करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक्षात डांबरी कारण कामची पाहणी करतांना असे दिसुन आले की, सदर रस्ताचा डांबरीकरणाचे काम हे अत्यंत निष्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे दिसुन आले आहे.
याबाबतची माहिती संबंधित बांधकाम विभागाचा अभियंत्याना व अधिकारी यांना देण्यात आली आणि सदर अभियंत्यानी सांगितले की, डांबरीकारण कामाचे ठेकेदरा कडून सदर काम पुनः करायला लावतो आणि मी या नंतर स्वता लक्ष देतो असे म्हणाले. सदर रस्ताचा डांबरीकरणाचे काम हे निष्कृष्ट असल्याची माहिती काल मौजा – ताडगुडा गावातील नागरिकांना सांगितले होते.
यावेळी सदर डांबरीकरण रस्त्याची पाहणी करतांना, येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, आरेंदा ग्राम पंचायतचे सदस्य – मुरा आत्राम आणि मौजा – ताडगुडा गावातील नागरिकांना मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.