युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची मीटिंग कळमेश्वर येथे मनीष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलंकार टेंभुर्णे कार्याध्यक्ष व डायरेक्टर शाहिरी पॅकेज मुंबई, जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे माजी सदस्य वृद्ध कलावंत मानधन समिती, प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम हे उपस्थित होते.
यावेळी विदर्भ संघटकपदी अरुण सहारे प्रबोधनकार कव्वाल, आकाशवाणी व टीव्ही सिंगर यांची नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा संघटकपदी कलावंत नामदेवराव ठाकरे, जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्रजी नाडेकर नागपूर जिल्हा महिला प्रतिनिधी फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या संगीता भक्ते, सौ उर्मिला वाडी, सौ मायाताई गणोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
कळमेश्वर तालुका अध्यक्षपदी परिवर्तनवादी राजेश श्रीखंडे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष शंकरराव होले, उपाध्यक्ष शंकररावजी श्रीखंडे, शेषराव चर्जन, सचिव शाहीर सुनील मेश्राम, सहसचिव भास्करराव खाटके व विजयराव कापसे, सहकोषाध्यक्ष प्रभाकरराव निंबाळकर, कोषाध्यक्ष किरण वानखेडे, संघटक युवराज हनवते, सहसंघटक वसंतराव शेंडे, प्रसिद्धी प्रमुख शंकर चिमोटे, महिला प्रतिनिधी सौ सुनंदा नामदेवराव ठाकरे, इंदिरा बागडे, ताई लेकुरवाळे, मीना गोतमारे, योगिता निशाने, दुर्गा यावलकर व सदस्य मधुकरराव खाटके, मनोहर गणोरकर दीपक मेश्राम, नरेंद्र कावडकर, कोलबाजी ढगे, सुरेशराव ढगे, दिवाकर चौधरी. वासुदेव शेंदरे, केशव सोनवणे, विष्णू तायवाडे, श्रीकांत श्रीखंडे, विठ्ठल अंजनकर, मनोहर गणोरकर, वासुदेव शेंद्रे, शकुन नेहारे,सुनील उरकुडे,भाऊराव खोबरे, चंद्रकला वाघमारे, जयाताई काकडे यांची नियुक्ती कळमेश्वर तालुका कार्यकारणी सदस्य पदी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य दयालजी कांबळे यांनी केले प्रमुख पाहुणे अलंकारजी टेंभुर्णे यांनी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेविषयी केलेले अनेक आंदोलन मोर्चे व त्यांचे फळ म्हणून आज कलावंतांना पाच हजार रुपये मासिक मानधन मिळत आहे असे संबोधित केले. विदर्भ संघटक लोकशाहीर अरुणभाऊ सहारे, नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम, महिला प्रतिनिधी संगीताताई भक्ते, प्रतिनिधी मायाताई गणोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीष भिवगडे केंद्रीय कार्याध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण करून सर्व कार्यकारणीचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्ह्याचे सरचिटणीस अरुणभाऊ वाहने यांनी केले तर आभार प्रदर्शन किरणजी वानखेडे तालुका कोषाध्यक्ष यांनी केले.